Success Password | सुनीता नागरे | Sarakarnama |

3 years ago
2

महाराष्ट्रातल्या सामाजिक सेवा क्षेत्रातील खूप विश्वासाने घेतले जाणारे नाव म्हणजे सुनीता नागरे. सुनीता नागरे यांनी अंधेरी येथील त्यांच्या अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राज्यभरात सेवाभावी जाळे विणले. आदिवासी पाड्यांमध्ये त्यांचं सुरू असलेलं काम महाराष्ट्रात शिक्षणाचा जबरदस्त ‘पॅटर्न’ म्हणून ओळखलं जातं. शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या हायफाय शाळेमध्ये, हायफाय गावांमध्ये जे सरकारी यंत्रणेला, लोकांना जमलं नाही, ते सुनीता नागरे यांनी आदिवासी पाड्यांवर छोट्या-छोट्या प्रयोगांतून करून दाखवलं. इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तुम्ही-आम्ही वेगळं नक्कीच काही करू शकतो, हे सुनीता नागरे यांनी सिद्ध केलं. एका शेतकऱ्याची मुलगी असलेल्या, जनसेवेचा वसा घेतलेल्या सुनीता नागरे यांचा हा थक्क करणारा प्रवास या सक्सेस पासवर्डच्या विशेष कार्यक्रमातून आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय. सुनीता नागरे यांच्यासारख्या सेवाभावी महिलांची आज गरज आहे. अशा महिला जर पुढे आल्या, तर इथे निर्माण होणाऱ्या त्या प्रत्येक कामाला ‘चार चाँद’ लागतील. ‘सकाळ’चे संपादक संदीप काळे यांच्यासोबत ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमात सुनीता नागरे यांच्या ‘सक्सेस’चा ‘पासवर्ड’ नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. #sandipkale #sandipkalesakal #sunitanagre #SUCCESSPASSWORD #successpassword
#saam #sakal #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...