सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट?| Rajesh Tope | Corona Third Wave | Maharashtra |Health |Sarkarnama

3 years ago
2

औरंगाबाद (Aurangabad): कोरोनाच्या तिसऱ्या लाटे (Corona third Wave)संदर्भात नीती आयोगाने जो अहवाल केंद्राला सादर केला आहे,तो आत्ताच नसून जून महिन्यात दिलेला आहे. यामध्ये त्यांनी सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच ही लाट आली तर देशात दररोज पाच ते सात लाख नवे रुग्ण आढळतील असा धोका व्यक्त केला होता. परंतु हा अहवाल आत्ताच नसून जुना असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. निती आयोगाच्या अहवालानुसार तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी या संदर्भातील सर्व तयारी राज्य सरकारने केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
#Coronavirus #RajeshTope #Aurangabad #CoronaThirdWave #PolicyCommission

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...