उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हास्यास्पद.. |Ambadas Danve| Aurangabad |Sarkarnama

3 years ago
2

औरंगाबाद (Aurangabad) : शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पालघर पोटनिवडणुकीतील सभेच्या जुन्या व्हिडिओ चा संदर्भ देत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आल्यावर पायात चप्पल घालून छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालतात,ही कृती महाराजांचा अपमान करणारी नाही का? मग अशा व्यक्तीला चपलेने मारले पाहिजे, असे विधान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले तर त्यात काय चुकले. महाराष्ट्रातील जनतेनेही याचा विचार करावा. विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यावेळी कुठल्याही संवैधानिक पदावर नव्हते. त्यामुळे आता तो विषय काढून गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी हास्यास्पद असल्याचे शिवसेना आमदार तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी म्हटले आहे.
#AmbadasDanve #Shivsena #BJP #MaharashtraPolitics #Politics #UddhavThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...