Injuried Tiger Cub

2 years ago
10

तळोधी (बा.):
तळोधी बा. वनपरिक्षेत्र अंतर्गत कच्चेपार बीट कक्ष क्रमांक 67 मध्ये काल दुपारला एका मेंढपाळाला वाघाने किरकोळ जखमी केल्याची घटना घडली. त्या नंतर त्या बीटाचे प्रभारी वन रक्षक एस.एस. गौरकर, व क्षेत्र सहाय्यक राजेश्वर गायकवाड हे घटनास्थळी मोका पंचनामा करायला गेले असता. झुडपात बसून असलेला वाघ जखमी असल्याचा निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कळवले.
ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी चे बायोलॉजिस्ट राकेश आहुजा यांनी येऊन चौकशी केली असता वाघाचा बछडा जखमी असल्याचे व अशक्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर चंद्रपूरचे TATR चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोबरागडे, अजय मराठे पोलीस कॉन्स्टेबल व आर.आर. टी. सोबत घेऊन पोचले. सायंकाळला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले व त्याला सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणण्यात आले व त्यानंतर समोरील उपचाराकरिता चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
सदर वाघ हा 9 महिन्याचा बछडा असून ती मादा वाघ असल्याचे कळले. तिच्या समोरच्या डाव्या पायाला दुखापत असल्याने चालू शकत नसल्याने अशक्त झाल्याची शक्यता आहे. ही जखम शिकारीचा प्रयत्न करताना किंवा जंगलात भ्रमंती करताना झाली असण्याची प्राथमिक शक्यता आहे.
सदर प्रकरणात तळोधी बा. वनपरिक्षेत्र अधिकारी  कैलास धोंडने, क्षेत्र सहाय्यक आर. गायकवाड, वनरक्षक एस.एस.गौरकर, श्रिरामे वनरक्षक, स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

Loading comments...