Success Password | पाशा पटेल | Sarakarnama |

3 years ago
1

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन पेटवणारे, तिथपासून ते बांबूशेतीचा नारा देत देशभर जनजागरण करत फिरणारे पाशा पटेल, आज शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत. पाशा पटेल जेव्हा बोलायला लागतात, तेव्हा भलेभले शांत बसतात. त्यांचा शेतीवर प्रचंड अभ्यास आहे. पाशा पटेल यांचा ग्रामीण शेतीबद्दल असलेला प्रचंड अभ्यास, अनेक देश विदेशांमध्ये त्यांनी शेतीच्या विकासासाठी घेतलेले धडे हे महत्वाचे विषय आहे. शेतीच्या प्रगतीसाठी पाशा पटेल यांनी परदेशातील कार्यशाळेतील नोंदविलेला सहभाग ज्यामुळे राज्याला खूप फायदा झाला. अत्याधुनिक शेतीमधील अनेक प्रयोग, शेतमालाला मिळवून दिलेले भाव असे कितीतरी विषय पाशा पटेल यांच्या नावाशी जोडले जातात. सुरुवातीला शरद जोशी, शेतकरी संघटना त्यानंतर भाजपा, गोपीनाथ मुंडेचे खंदेसमर्थक इथपासून ते शेतकऱ्यांचे भावनिक साथीदार अशी ओळख पाशा पटेल यांची आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. जातीचे राजकीय रंग सोबत नाहीत. अशा वातावरणात पाशा पटेल यांनी जे काही उभे केले आहे त्याचा एक स्वतंत्र इतिहास होऊ शकतो. पाशा पटेल यांनी मिळविलेल्या ‘सक्सेस’कडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. पाशा पटेल यांचा ‘सक्सेस’ नेमका काय आहे? हे तुमच्यासमोर आम्ही मांडतोय. सकाळचे संपादक संदीप काळे यांच्या ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमात पाशा पटेल यांनी आपल्या आयुष्याचा ‘सक्सेस’ मिळवला कसा याचा उलघडा केला आहे.
#Sandip_Kale #pashapatel #Sandip_Kale_Sakal #SUCCESS_PASSWORD #Saam #Sakal #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...