Anil Deshmukh: अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

अनिल देशमुखांनी ईडी विरोधात हायकोर्टात याचिका केलीय. ईडीनं दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. त्याचबरोबर ईडीनं बजावलेलं समन्स रद्द करण्यात यावं अशीही मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. अनिल देशमुखांच्या या याचिकेवर सुनावणी सुरू झालीय. देशमुखांनी ईडीला नेमक्या कोणत्या गुन्ह्यांची माहिती हवी आहे, तीच दिली जात नसल्याचं म्हटलंय. तर त्याला प्रतिउत्तर देताना ईडीकडून देशमुखांनी दाखल केलेल्या याचिकेच्या वैधतवरच प्रश्न उपस्थित केलंय.
अनिल देशमुखांच्यावतीनं त्यांचे वकिल विक्रम चौधरी युक्तिवाद करतायत.
#anildeshmukh #anildeshmukhoned #ed #edinvestigation #investigation #maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...