Pune : देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत काय? | Pune | Sarkarnama

3 years ago
2

Pune : देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्या वकिलीच्या पदव्या बोगस आहेत काय?

Pune : भाजप (BJP) नेते फडणवीस (Devendra Fadnavis) व शेलार (Ashish Shelar) सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी (OBC Reservation) निकालाबाबत जो प्रचार करीत आहेत, तो पाहता त्यांच्या लॉ च्या पदव्या बोगस असाव्यात अशी शंका येते. असा आरोप प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी केला आहे. ''सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राज्यघटनेच्या कलम १४२ खाली दिलेला असल्याने तो सर्व देशाला लागू झालेला आहे. त्यानुसार सर्व देशातले ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. निकालपत्र, परि.२६ व भारतीय संविधान, कलम १४२) ही वस्तुस्थिती दडवून हे दोघेही या निकालाबाबत वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. फक्त महाराष्ट्रातले आरक्षण गेले असून बाकी सर्व राज्यातील आरक्षण कायम असल्याचे ते सांगत असतात. या दोघांनाही न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कोर्टात खेचायला हवे. वकिलीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना जी माहिती असते ती यांना नसेल तर त्यांच्या वकिलीच्या पदव्या बोगसच असणार!'' असे मत त्यांनी याबाबत मांडले.

#harinarke #DevendraFadnavis #OBCReservation #AshishShelar #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...