Satara: अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भरसभेत मागितली माफी | Ajit Pawar|Sarkarnama

3 years ago
3

Satara : अजित पवार यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भरसभेत मागितली माफी

Satara : सातारा जिल्ह्यातील वडूज येथील कोव्हिड हॉस्पिटलच्या उदघाटनाच्या वेळी स्टेजवर भाषण करत असताना `मी पाच वर्षे इथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलं`, अस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडबडीत बोलले. त्यामध्ये सुधारणा करत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यांना त्यांची चूक चिठ्ठी पाठवून लक्षात आणून देत जिल्हाधिकारी नव्हे तर पालकमंत्री असे हवे, असे सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी करत मी जिल्हाधिकारी? एवढं कुठं शिकलोय?, असे म्हणत खूप दिवसांनी एवढीशी चूक झाली. मागे फार मोठी चूक झाली होती. तेव्हा चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसून साहेब चुकलं, साहेब चुकलो अस म्हणालो होता, अशी आठवण त्यांनी सांगताच सर्वत्र एकच हशा पिकला. त्यानंतर पवार यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे बघून हात जोडत, साहेब चुकलं, अस म्हणतं चुकीची कबुली दिली.

#ajitpawar #satara

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...