दादा, आमच्याही लोकांचं ऐका,नाही तर गडबड होईल : Sanjay Raut | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

दादा, आमच्याही लोकांचं ऐका,नाही तर गडबड होईल : संजय राऊत
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आमचं ऐकत नाहीत, या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारीवर राज्यात आपला मुख्यमंत्री असून त्यांचं अजितदादा ऐकतात मग, असं कसं होईल,अशी विचारणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भोसरीत केली.आपण त्यांना सांगू आमचंही ऐकलं,तर बरं होईल. नाही, तर मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेच आहेत.आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आमच्या लोकांचही ऐकत जा.नाही, तर गडबड होईल, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. त्यावर मिश्कीलीतून हा अप्रत्यक्ष इशारा, तर राऊतांनी दिला नाही ना अशी चर्चा उपस्थितात ऐकायला मिळाली.
#SanjayRaut #Shivsena #Ajitpawar #NCP #Pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...