#KirtankarTajuddinMaharaj | कीर्तनकार ताजोद्दीन शेख यांचं कीर्तन सुरु असतानाच निधन | Sarkarnama

3 years ago
3

निजामपूर (धुळे) : राष्ट्रीय मुस्लिम कीर्तनकार तथा वारकरी संप्रदायाचे प्रचारक व प्रसारक ताजोद्दीन शेख महाराज (अंदाजे वय ५७) यांचे सोमवारी (ता.२७) रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) येथे ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सप्ताहादरम्यान किर्तनसेवा देतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने वारकरी बांधवांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांना जामदेहून प्रथमोपचारासाठी तातडीने शनिमांडळ व नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान नंदुरबारहुन त्यांचे शव औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे समजते.
#TajjuddinMaharaj #RIP #Kirtankar #Aurangabad #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...