Success Password | डॉ. सुरेश शेळके | Sarkarnama |

3 years ago
1

'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
अतिथी : डॉ. सुरेश शेळके

डॉ. सुरेश शेळके. महाराष्ट्रातल्या सेवाभावी चळवळींचा - संस्थांचा आधारवड म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जाते. डॉ. सुरेश शेळके उत्तम व्यवसायिक, पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते, उत्तम नियोजनकार, उत्तम प्रशासक अशा अनेक ओळखी त्यांच्याभोवती आहेत. बार्शी हे मूळ गाव असलेले, डॉ. सुरेश शेळके देशविदेशातील अनेक सामाजिक संघटनांशी संबंधित आहेत. त्यांनी उभी केलेली सामाजिक चळवळ आज अनेक स्वरूपाने ओळखली जाते. पुणतांब्यामधील आशा केंद्र, विकास अध्ययन केंद्र, अनेक इंटरनॅशनल उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे. एका सर्वसामान्य गरीब शेतमजुराचा मुलगा जेंव्हा इंटरनॅशनल स्वरुपामध्ये आपले वेगळेपण प्रस्थापित करतो, दुःखीतांचे अश्रू पुसण्यासाठी पुढे येऊन काहीतरी करण्याचा मानस आखतो आणि हे सगळं करताना तो आपली मुख्य ओळख मी शेतकर्‍याचा मुलगा आहे हे कधीही विसरत नाही. हे खूप महत्त्वाचे आहे. आज 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. सुरेश शेळके यांचा इतिहास, त्यांनी उभं केलेलं काम आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी अंगीकारलेला 'सक्सेस पासवर्ड' कोणता आहे, हे आपण पाहणार आहोत. चला तर मग, डॉ. सुरेश शेळके यांच्यासोबत' सक्सेस पासवर्ड' या खास कार्यक्रमात सहभागी होऊया.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Dr_Suresh_Shelke #Mumbai
#SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...