वाहन फिटनेस दंड रद्द ; मोटार वाहन मालक चालक संघटनेचे जावेदखान पठाण यांनी मानले आभार

6 months ago
8

पंधरा वर्षाच्या आतील वाहनास, ऑटो रिक्षा, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन, मिनी बस आदी वाहन चालकांकडून दररोज पन्नास रुपये फिटनेस लेट दंड आकारण्यात येत होता. हा नियम रद्द करण्याची मागणी मोटार वाहन मालक चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेदखान पठाण यांनी मोटार वाहन चालकांसह आंदोलने केली होती, व हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती,तर 11 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात वाहन फिटनेस दंड रद्द करण्याची घोषणा केली असल्याने सायंकाळी 7 वाजता जावेदखान सलीमखान पठाण यांनी अकोल्यातील अकोट फाईल येथून प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री शिंदेंचे आभार व्यक्त केले.

Loading comments...