उंचावरून पडला तरी फुटणार नाही Samsung Galaxy XCover7.फक्त वॉटरप्रूफ नव्हे तर शॉकप्रूफ.

11 months ago
10

उंचावरून पडला तरी फुटणार नाही सॅमसंगचा मिलिट्री ग्रेड रेटिंग असलेला Samsung Galaxy XCover7! फक्त वॉटरप्रूफ नव्हे तर शॉक प्रूफ हि.

Samsung Galaxy XCover7 मध्ये डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसर आहे. हा ६ जीबी रॅम+ १२८जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. ह्यात MIL-STD-810H अमेरिकन मिलिट्री ग्रेड रेटिंग मिळते.

सॅमसंगनं कोरियात व इतरत्र Samsung Galaxy XCover7 स्मार्टफोन आणि Samsung Galaxy Tab Active5 टॅबलेट लाँच केला आहे. दोन्ही डिवाइस MIL-STD-810H अमेरिकन मिलिट्री ग्रेड रेटिंगसह आले आहेत. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी एक्स कव्हर ७ १.५ मीटर पर्यंत शॉक रेजिस्टंट आहे. ह्यात ६.६ मोठा डिस्प्ले, डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसर, ५०एमपी रियर कॅमेरा असे अनेक फीचर्स मिळतात. चला, जाणून घेऊ नवीन मोबइलची संपूर्ण माहिती.

Samsung Galaxy XCover7 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy XCover7 मध्ये ६.६ इंचाचा टीएफटी एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो फुल एचडी+ रिजॉल्यूशन, ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट, २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस+ च्या प्रोटेक्शनसह आला आहे. फोनचे वजन २४० ग्राम आणि डायमेंशन १६९.० × ८०.१ × १०.२ मिमी आहे.

फोनमध्ये माली जी५७ जीपीयू सह मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. डिवाइसमध्ये ६ जीबी रॅमसह १२८GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तर मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं स्टोरेज वाढवता देखील येईल. Samsung Galaxy XCover7 अँड्रॉइड १४ आधारित वनयुआय वर चालतो.

मोबाइलमध्ये LED फ्लॅशसह ५०एमपीचा रियर कॅमेरा आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५एमपीचा कॅमेरा आहे. Samsung Galaxy XCover7 मध्ये ४,०५०एमएएचची बॅटरी, १५वॉट फास्ट चार्जिंग, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि चार्जिंगसाठी पोगो पिन पण देण्यात आली आहे.

सॅमसंग मोबाइलमध्ये आयपी६८ पाणी व धूळ प्रतिरोधक रेटिंग, MIL-STD-810H रेटिंग, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि ३.५ मिमी ऑडियो जॅक सारखे फीचर्स मिळतात. फोनच्या सुरक्षेसाठी सॅमसंग नॉक्स वॉल्टसह फेस अनलॉक आणि सॅमसंग नॉक्सची सुविधा आहे. फोनमध्ये ड्युअल-सिम ५जी, वायफाय, ब्लूटूथ ५.३, एनएफसी, जीपीएस, ग्लोनास, गॅलीलियो आणि यूएसबी २.० पोर्टचा समावेश आहे.

सॅमसंगनं सध्या Galaxy XCover7 ची किंमत शेयर केली नाही. ब्रँड नुसार हा डिव्हाइस ह्या महिनाय्च्या शेवटी काही निवडक देशांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. हा हँडसेट भारतात येण्याची शक्यता देखील काही दिवसांपूर्वी वर्तवण्यात आली होती.

Loading comments...