शेअर बाजारातून कमाई करायची असेल तर या गोष्टी करू नका, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागले.

1 year ago
19

शेअर बाजारातून दर महिन्याला कमाई करायची असेल तर या गोष्टी करू नका, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागले.

शेअर बाजारात गुंतवणूक करायचे प्रत्येकाला आकर्षण असते, पण शेअर बाजारातून पैसे कमवणे सोपे नाही. अतिशय विचारपूर्वक आणि धोरणात्मक गुंतवणूक करूनच येथे नफा मिळवता येतो. सहसा किरकोळ गुंतवणूकदार काही सामान्य चुका करतात ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

अतिआत्मविश्वास

भारतीय शेअर बाजारातील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला एकदा म्हणाले होते की, बाजाराचं राजा आहे आणि यावर कोणीही शासन करू शकत नाही. परंतु, अनेक गुंतवणूकदारांना असा भ्रम होतो की त्यांना बाजाराची हालचाल समजली आहे विशेषत: बुलच्या रॅलीमध्ये त्यांच्यात अति आत्मविश्वास निर्माण होतो जे त्यांना बुडवतो.

एकाचे अनुसरण करणे

बरेच लोक स्टॉकच्या मागे पाळतात, ज्यामुळे बरेच गुंतवणूकदार त्यात नफा होईल असा विचार करून त्यात पैसे गुंतवतात. एका गर्दीच्या मागे लागण्याचा तोटा म्हणजे बाजारात बुडबुडा तयार करतो आणि जेव्हा हा फुगा फुटतो तेव्हा गुंतवणूकदारांचा खिसा रिकामा होतो.

भावनिक निर्णय घेणे

बहुतेकदा भावनिक निर्णय घेण्याचे परिणाम चांगले नसतात, परंतु अनेक गुंतवणूकदार हीच चूक करतात. बाजारातील ट्रेडर्स भावनिक होऊन निर्णय घेतात, परिणामी त्यांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत, तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खोलवर चौकशी करा, संशोधन करून त्या आधारे कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवायचे की नाही हे ठरवा.

आधी निर्णय अन् मग मत घ्यायचे

एखादी गोष्ट करायची की नाही हे आधी ठरवायचे आणि मग इतरांचा सल्ला घेण्याची अनेकांची सवय असते. याच सवयीनुसार तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास ही सवय लगेच सुधारा नाहीतर तुमचे खूप नुकसान होऊ शकते. या सवयीचा तोटा म्हणजे तुमच्या निर्णयाच्या समर्थनार्थ जे काही मत येईल ते तुम्ही स्वीकारता. तुमच्या विरोधात असलेल्या मतांना महत्त्व दिले जात नाही, त्यामुळे आधी सल्ला घेऊन मगच गुंतवणुकीचा निर्णय घेणे चांगले असते.

स्टॉकला चिटकून राहणे

रिटेल गुंतवणूकदार बहुतेकदा एका शेअरशी चिकटून असल्याचे दिसून आले आहे विशेषतः असे शेअर्स ज्यांनी त्यांना आधीच पूर्वी चांगला परतावा दिला आहे. गुंतवणूकदार बहुतेकदा स्टॉकमध्ये पडझड सुरू झाली की ते विकत नाहीत, तर योग्य वेळेची प्रतीक्षा करतात. त्यांना हीच चूक महागात पडते आणि त्यांचा पोर्टफोलिओ परतावा घसरतो. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ शेअर्सचे नेहमी विश्लेषण करत राहावे. तोटा होणारे स्टॉक्स काढून टाकावे आणि चांगल्या गोष्टींचा समावेश करणे एक चांगली रणनीती असू शकते.

कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवू नका

बरेच लोक मित्र किंवा बँकांकडून कर्ज घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवतात. हे करू नये कारण ते खूप धोकादायक असते. जर तुम्ही पैसे गमावले तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब अडचणीत येऊ शकता म्हणून पैसे ऊसणे घेऊन शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळा.

Loading comments...