बेस्टची नवी बस आली.

1 year ago
6

बेस्टची नवी बस आली.

बेस्टच्या ताफ्यात नुकत्याच नव्या इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. गोल्ड स्टोन (बीवायडी) या कंपनीनं या बसची निर्मिती केली असून या संपूर्णपणे विद्युत मिडी बस आहेत. या बस गाड्यांमुळं 'बेस्ट'ची मोठी आर्थिक बचत होणार आहे.

थाटात झालं लोकार्पण

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वडाळा आगारात नुकताच या बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. जाणून घेऊया या बसची वैशिष्ट्ये...

आरामदायी आसनं

नव्या बसची आसन क्षमता चालकासह ३१ प्रवासी इतकी आहे. बसमधील आसनं प्लॅस्टिक मोल्डेड आणि स्टेनलेस स्टिलचे स्टेन्चन बार यांनी बनवलेली आहेत.

इलेक्ट्रिक बसमधील बॅटरीची क्षमता

या बसमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. तिची क्षमता १६० केडब्ल्यूएच इतकी आहे.

मोबाइल चार्जिंगचीही सुविधा

इलेक्ट्रिक बसच्या चार्जिंगची क्षमता ५० केडब्ल्यूएच इतकी आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर ही बस २०० किमी चालू शकणार आहे. चार्जिंग सपल्यानंतर इंधनावर चालू शकेल, अशीही व्यवस्था यात करण्यात आली आहे. या बस गाड्यांमध्ये ६ मोबाइल चार्जिंग पोर्टची सुविधा आहे. त्यामुळं प्रवाशांना बसमध्येच मोबाइल चार्ज करता येणार आहे.

प्रदूषणमुक्त

इंजिनाची गरज नसल्यानं ही बस ध्वनी प्रदूषणापासून मुक्त असेल. तसंच, बसमधील प्रवाशांना वायू प्रदूषणाचाही त्रास होणार नाही.

इन्टेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम

या बसमध्ये इलेक्ट्रॉनिक गंतव्यदर्शक फलक, सर्व्हिलन्स कॅमेरा, रिअर व्यू कॅमेरा तसंच, प्रवाशांसाठी उद्घोषणेचीही सुविधा आहे.

इंधन खर्च वाचणार

इलेक्ट्रिक बसमुळं बेस्टचा इंधनावरील अनावश्यक खर्च वाचणार आहे. डिझेल बसला एक किमी प्रवासासाठी २० रुपये लागतात. सीएनजी बसला १५ रुपये लागतात. तर, इलेक्ट्रिक बसला एक किमीच्या प्रवासासाठी अवघा ८ रुपये खर्च येणार आहे.

या मार्गांवर धावणार

ही बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते बॅकवे, सीएसएमटी ते वर्ल्ड ट्रेड सेंटर, गेट वे ऑफ इंडिया ते चर्चगेट (पूर्व), चर्चगेट ते एनसीपीए, चर्चगेट ते फ्री प्रेस मार्ग, सीएसएमटी ते सीएसएमटी व्हाया आरबीआय आणि सीएसएमटी ते चर्चगेट व्हाया एनसीपीए या मार्गावर धावेल.

Loading comments...