गोराई परिसरातील तरुणांमध्ये वाढत असलेले अमली पदार्थ सेवनाचे व्यसन, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम हो

1 year ago
2

गोराई परिसरातील तरुणांमध्ये वाढत असलेले अमली पदार्थ सेवनाचे व्यसन, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम होणारे अमली पदार्थांचे सेवन यामुळे आपल्या परिसरातील तरूण पिढीवर होणारे दुष्परिणाम तसेच राजकीय अनास्थेमुळे आणि आपल्या एकजुटी अभावी प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष आणि त्यामूळे उद्दभवलेल्या सामजिक आणि पायाभूत समस्या इत्यादींवर ठोस उपाययोजना व्हावी, तरुणांना व्यसनाधीनते कडे नेणाऱ्या अमली पदार्थ विक्रेत्यांवर वचक बसावा या उद्देशाने राजकीय मतभेद किंवा राजकीय विचारधारा बाजूला ठेवून केवळ गोराईचा सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कला आणि क्रीडा या क्षेत्रात विकास होऊन आपणा सर्वांची गोराई एक आदर्श वसाहत बनावी, येथील वातावरण सुसंस्कृत आणि शांततामय असावे या उद्देशाने स्थापन झालेल्या *आम्ही गोराईकर जागृत समिती* ची बैठक शनिवार दिनांक २६/०८/२०२३रोजी संध्याकाळी 7•15 वाजता स्वामी विवेकानंद शाळा गोराई 1 येथे आयोजित करण्यात आली आहे . आपण सर्वांनी बैठकीत सहभागी होऊन गोराईच्या उज्ज्वल भवित्तव्याबाबत आपले विचार व्यक्त करा. 🙏🙏

Loading comments...