जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये केलेल्या बेछूट गोळीबारात आरपीएफ अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्

1 year ago
1

मुंबई/पालघर!

रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) जवान चेतन सिंहने सोमवारी पहाटे *जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये केलेल्या बेछूट गोळीबारात आरपीएफ अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू* झाला. वापी स्थानकावरून सुपरफास्ट पॅसेंजर सुटली. तिने पालघर ओलांडल्यानंतर वैतरणा ते विरार स्थानकादरम्यान तीन डब्यांमध्ये फिरून चेतनने १२ गोळ्या झाडल्या. चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर चेतनने धार्मिक विधाने केल्याचा व्हिडीओही समोर आल्याने त्याबाबतही त्याची चौकशी सुरू आहे.

चेतनने हा गोळीबार नेमका का केला?, याचे कारण समजू शकलेले नाही. तो तापट स्वभावाचा आहे आणि ड्यूटीवर झोपू न दिल्याने, पूर्णवेळ काम करावे लागल्याने त्याचा वरिष्ठांशी वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र तो सतत जबाब बदलत आहे. इतर प्रवाशांनी पाठलाग करू नये, म्हणून त्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा अंदाजही सुरुवातीला व्यक्त केला जात होता. या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना (५८), अब्दुल कादरभाई मोहम्मद हुसेन भानपूरवाला (६२, नालासोपारा), असगर अब्बास शेख (४८, रा. मधुबनी, बिहार) यांच्यासह एका अनोळखी प्रवाशाचा (३५ ते ४० वर्षे) मृत्यू झाला आहे.

Loading comments...