धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा पंधरावा दिवस 🔥

1 year ago
18

*आज ०७ मार्च धर्मवीर संभाजीराजे बलिदानमासाचा पंधरावा दिवस 🔥*

*आजच्या या पंधराव्या श्लोकाचा अर्थ -*

*आपण कोणाही समोर , कोणत्याही परिस्थितीत लाचार होऊन जगायचे नाही , ज्याप्रमाणे शंभूराजे आणि कवी कलशांना औरंगजेबाने कुरणीसात करणण्यास सांगितला , माझ्या समोर झुकून मुजरा करण्यास सांगितला पण शंभूराजे शिवरायांचे छावे होते , ते त्या औरंग्यापुढे झुकले नाहीत तर शंभूराजांचा रुद्रावतार पाहून तो औरंगजेबच राज्यांच्या समोर गुडघे ठेकून बसला , मात्र शंभूराजे आपल्या समोर झुकले नाहीत हि गोष्ट त्या औरंगजेबाला सहन.झाली नाही त्याने शंभूराजांना आणि कलशांना क्रूर मरणयातना देण्यास सुरुवात केली त्या मरण यातना पाहून तो यमही थरथरत होता परंतु तरीही शिवछत्रपतींचे छावे आपले स्वराज्यरक्षण्यासाठी मागे हटले नाही , कोणाही समोर लाचार न होता झुकले नाही , स्वाभिमानाने मृत्यूस सामोरे गेले, शंभूराजांकडून आपणही गोष्ट शिकली पाहिजे की आपल्या देव , देश व स्वराज्यधर्माप्रती असणारा आपला स्वाभिमान साक्षात मृत्यू जरी समोर आला तरी सोडायचा नाही , जर कोणी आपणास लाचार होऊन जगण्यास सांगत असेल तर त्याच क्षणी विष गिळून आपण मेले पाहिजे कारण शिवछत्रपती आणि शंभूछत्रपतींनी आपल्याला सांगितलय की एखाद्या वेळेस मृत्यूला जवळ करा पण लाचारी , शरणागतीला नाही.*

Loading comments...