आमदार प्रणिती शिंदे यांची बैठक जळगाव जिल्हा पदाधिकाऱ्यांना पडली महागात |Sarkarnama| Jalgaon|

3 years ago
9

आमदार शिरीष चौधरी यांच्यासह २५ जणावर गुन्हा दाखल

जळगाव,त.१८;काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्याच्या कारणावरून आमदार शिरीष चौधरी यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत १५ मे रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अजिंठा विश्रामगृह येथे विनापरवानगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीला रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य २० ते २५ जणांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या कोरोना प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात भा.द. वि. कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आ

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...