शरद पवार यांनी फडणवीसांना 'या' विषयावर मागर्दशन केले... | Sanjay Raut | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

शरद पवार यांनी फडणवीसांना 'या' विषयावर मागर्दशन केले...

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवास्थानी भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की ''नक्कीच शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मार्गदर्शन केले असेल, शरद पवार हे देखील विरोधी पक्ष नेते होते आणि त्या काळात त्यांनी राज्याच्या विधिमंडळात चांगले काम केले आहे, ही एक सदिच्छा भेट असू शकते, प्रत्येक भेटीचा असा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही, त्यामुळे त्याकडे राजकीय हेतूने पहाने चुकीचे होईल, असेही राऊत म्हणाले.

#SanjayRaut #DevendraFadnavis #SharadPawar #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...