तुपकरांनी अभियंत्याला खड्ड्यात उतरून करायला लावले काम... | Buldhana | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

तुपकरांनी अभियंत्याला खड्ड्यात उतरून करायला लावले काम...

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकर यांचे नाव समोर येताच शेतकऱ्यांसाठी आक्रमकतेने झगडणारा नेता डोळ्यांसमोर येतो. कधी-कधी तर रविकांत तुपकर अधिकाऱ्यांना धारेवर धरून आपल्याच स्टाईलने कामे करून घेतल्याचेही प्रकारही आपण ऐकले आणि पाहिले असतील. मात्र यावेळी रविकांत तुपकरांनी दंडुकेशाहीने आपल्या घरासमोरील पाइपलाइन लिकेजचे काम जिल्ह्याच्या कार्यकारी अभियंत्याकडून करवून घेतल्याचा प्रकार हाती लागलेल्या एका व्हिडिओमुळे समोर आला आहे. यामुळे रविकांत तुपकर यांच्या दादागिरी स्टाईलमुळे ते अधिकारी वर्गात चर्चेत येणार, हे मात्र निश्‍चित.

#ravikanttupkar #buldhana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...