नक्षली महिलेचे आत्मसमर्पण | Sarkarnama| Naxalism| Gadchoroli|Naxaliladies|maharashtra|crpf

3 years ago
1

गडचिरोली : दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या कुख्यात नक्षली महिलेने सुरक्षा दलांपुढे आज आत्मसमर्पण केले. गडचिरोलीच्या CRPF उपमहानिरीक्षकांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर तिला गडचिरोली पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. करिष्मा नरोटी (20) असे या महिला नक्षलीचे नाव असून, छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथील मूळनिवासी आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीच्या एकूण चार गुन्हे दाखल आहेत. तिची माहिती देणाऱ्यांना दोन लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले होते. दरम्यान, 2019 ते आजवर गडचिरोली पोलिसांपुढे एकूण 38 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
#sarkarnama #maharashtra #gadchiroli #police #maharashtrapolice #crpf #Naxalism

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...