तुम्ही व्यापाऱ्यांना फटकवा, मी त्यांचे लायसन्स रद्द करतो | Junnar |Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

उत्तर भारताला उन्हाळी हंगामात सर्वाधिक टोमॅटो पुरवठा करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव उपबाजार समितीमध्ये आज टोमॅटोचे बाजारभाव व्यापा-यानी पाडल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांनी मध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. यामध्ये थेट सभापती संजय काळे हेच आंदोलनात सहभागी झाले. तुम्ही व्यापा-यांना फटकवा मी त्यांचे लायसन्स रद्द करतो, असा इशारा दिला. आज सकाळी शेतकरी आपले टोमॅटो घेऊन विक्रीसाठी नारायणगाव उपबाजार समितीत आले तेव्हा 20 किलोच्या क्रेटला एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये प्रति क्रेट बाजार भाव होता. परंतु व्यापाऱ्यांनी संगनमत करून हा बाजार भाव क्रेट साठी वीस ते तीस रुपये केल्याने शेतकरी संतप्त झाले व शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी सभापती संजय काळे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केल्यास त्या व्यापाऱ्याचे लायसन रद्द केले जाईल असेही सभापती संजय काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
#Junnar #Farmer #krushiutpannabazarsamiti #Narayangaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...