आढळराव, भाजपला दोष देणे बंद करा; शिवसेनेची काळजी करा : गणेश भेगडे | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

आढळराव, भाजपला दोष देणे बंद करा; शिवसेनेची काळजी करा : गणेश भेगडे

शिक्रापूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीत खेड आणि जुन्नरमधील शिवसेनेचे उमेदवार हे केवळ माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील पक्षांतर्गत राजकीय नाराजीमुळे पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या दोन्ही तालुक्यांमधील राजकीय पराभवाला भाजपला दोष देणे बंद करावे. उलटपक्षी त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष मर्जीतील प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉंम्ब काय म्हणतोय, त्याचे चिंतन करावे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या अनैसर्गिक युतीने पक्ष संपून जाईल, त्याची आता काळजी करावी. आम्ही तर सरनाईक यांच्या भावनांचे स्वागत केले आहे, तुम्ही करायचे की नाही, ते आता तुम्ही ठरवा, असे म्हणत भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून चिमटा काढला.

#ganeshbhegade #BJP ##Shivsena #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...