मला, शिवसेना आणि पक्षप्रमुख यांचा आदेश काय असतो ते समजले | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

मला, शिवसेना आणि पक्षप्रमुख यांचा आदेश काय असतो ते समजले

औरंगाबाद: शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब आणि शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मला शिवसेना पक्षातील कार्यपद्धती समजावून सांगत माझा आणि नवनियुक्त जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचा वाद सामंजस्याने मिटवला आहे. मी पहिल्यापासून माननीय बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असून यापुढेही शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत करणार असल्याचे माजलगाव शहर प्रमुख पापा सोळंके यांनी म्हटले आहे. शिवसेना संपर्क प्रमुख आनंदीजी जाधव साहेब यांच्याबद्दल रागाच्या भरात मी जे काही बोललो त्याबद्दल मी माफी मागत आहे. यापुढे जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात पक्ष वाडी चे काम अतिशय जोमात सुरू असून यापुढे मी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे.

#shivsena #aurangabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...