Maratha Aakrosh Morcha: संचारबंदी झूगारून सोपालूरमध्ये मराठा मोर्चा | Sarakarnama

3 years ago
1

सोपालूर : सोलापुरात आक्रोश मोर्चासाठी मराठा संघटनांचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी लावलेले बॅरिकेटिंग ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हीत. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी रस्त्यात अडवल्याने स्वतः रुग्ण असल्याचे भासवत हाताला सलाईन लावून भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख मराठा आक्रोश मोर्चात सहभागी झाले आहेत. पुणे -हैद्राबाद उड्डाण पुलावर उभे राहून हात उंचावत एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी करण्यात येत आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत.
#Solapur #Marahta #MarathaAndolan #MarathaAaksroshMorcha
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...