शिवसेनेच्या दोन गटात राडा: मास्क न लावल्याच्या कारणावरून वाद | Shivsena | Wardha | Sarakarnama

3 years ago
5

वर्धा ः शिवसेनेचे नेते उदय सामंत वर्ध्यात आले असता त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत विश्रामगृहात शिवसैनिकांत राडा झाला. एका गटाकडून शिवसेना संपर्क प्रमुखाच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला जातो तर दुसर्‍या गटाकडून संपर्क प्रमुखांसोबत काहीही घडल नसल्याच म्हणण आहे.
निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याने मास्क लवले नसल्याचे सांगण्यात आले आहे. याकरिता हटकल्यावरून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीमंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सिताराम भूते मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी मास्क न लावल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. त्यावरून दोन गटांत चांगलीच बाचाबाची झाली. शिवीगाळही झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यावेळी सिताराम भूते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कानशिलात हाणल्याचा दावा केला.
--------------
सीताराम भुते मास्क लावून नसल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली. भुते यांनी चुकीचं वक्तव्य केल्याने त्यांना शिवप्रसाद दिल्याचे जिल्हा प्रमुखांचे म्हणणे आहे. संपर्क प्रमुखांशी काहीही झाले नाही. तेव्हा तेथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट आहे.
- प्रशांत शहागडकर
जिल्हाप्रमुख
-------------------------------
उदय सामंत साहेब वर्ध्यात आले असता त्यांना विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. यावेळी संपर्क प्रमुखांनी जरा वरच्या सुरात संवाद साधला. यामुळे बाचाबाची झाली. यात संपर्क प्रमुखाला दोन कानशीलात दिल्या.
- सीताराम भुते
शिवसेना कार्यकर्ता, हिंगणघाट
#Wardha #Maharashtra #Shivsena #ShivsenaGroup
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...