Wabalewadi Z P School: ही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची! | Sarakarnama

3 years ago
2

पुणे(Pune) : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेची(Wabalewadi Z P School) काही लोकांनी नाहक बदनामी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्याला कंटाळून मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे(Dattatray Ware), जयसिंग नऱ्हे व एकनाथ खैरे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. उर्वरित १० शिक्षकही राजीनाम्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या घटनेची दखल घेऊन शाळेची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई, अशी मागणी धस यांनी केली.
#Wabalewadi #Pune #WabalewadiZPSchool #SureshDhas #UddhavThackrey #AjitPawar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...