Social media mission: ''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' | Jalgaon | Sarakarnama

3 years ago
1

जळगाव(Jalgaon) : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे(BJP Leader Pankaja Munde) यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाज बांधवांची आहे. त्यामुळे या पक्षाचा त्यांनी तातडीने त्याग करून ताबडतोब शिवसेनेत(SHivsena) प्रवेश करावा असे आवाहन वंजारी समाज करीत आहे. वंजारी समाज भारतीय जनता पक्षाचा निषेध करीत आहे. पंकजाताई यांनी आता भारतीय जनता पक्षात न राहता शिवसेनेत प्रवेश करावा, त्या ठिकाणी त्यांचा योग्य सन्मान होईल, असे महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाधक्ष प्रशांत नाईक(Prashant Nike) यांनी सांगितले.
#PankajaMunde #PankajaMundeSupporter #SocialMediaMission #LeaveBJPJoinShivsena #PrashantNaik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...