Success Password | सचिन चव्हाण | Sarakarnama

3 years ago
3

सचिन चव्हाण(Sachin Chavan) गावकुसाच्या प्रेमाखातर जीव ओतून काम करणारं तरुण तडपदार, प्रेरणादायी नेतृत्व. एक युवक कामाच्या शोधामध्ये पुण्यामध्ये येतो, आणि पुण्यामध्ये आपलं वेगळं विश्व निर्माण करतो. त्या युवकांचे नाव सचिन चव्हाण. सचिन चव्हाण मराठवाड्यातल्या परभणीचे(Parbhani). केवळ आपणच पायावर उभे नाही राहायचे तर, आपल्या आसपास असणाऱ्या गावातल्या तरुणांच्या हातांना काम देण्याचे स्वप्न सचिन चव्हाण यांनी प्रत्येक्षात उतरवलय. घर नसलेल्यांना निवारा देत, आपण लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून सचिन चव्हाण यांनी खूप मोठे काम उभे केले आहे. पुण्यामध्ये मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून उभं केलेलं काम सामाजिक जाणीव ठेवून केलेले काम असल्याची पावती अनेक गरजूंना भेटल्यावर कळते. गरीब मुलांसाठी वसतिगृह, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, अशा कितीतरी वेगळ्या उपक्रमांना चालना देत सचिन चव्हाण गरिबांचे, कष्टकार्यांचे आधारवड म्हणून सर्व परिचयाचे आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या काम उभे करण्याचा मुख्य उद्देश आपल्या भागातील मुलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्यांना यश ही आले. सचिन चव्हाण यांनी पुण्यात, मुंबईत(Mumbai) खूप मोठं काम उभे केले आहे. या कामाच्या माध्यमातून त्यांचे वेगळेपण या समाजापुढे आले. सचिन चव्हाण यांचा ‘सक्सेस पासवर्ड’ इतरांना चालना देणारा आहे. सचिन चव्हाण यांचा थक्क करणारा प्रवास आणि उंच जाणाऱ्या आलेखाचा ‘सक्सेस पासवर्ड’ नेमका आहे, तरी काय जाणून घेतला आहे. सकाळचे संपादक संदीप काळे यांनी. #sandipkale #sandipkalesakal #successpassword #sachinchvhan #sakal #sarkarnama #saam

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...