Chitra Wagh; संजयजी राऊत यांना थाप काय दिली तर | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

चित्रा किशोर वाघ(Chitra Wagh)
भाजप,प्रदेश उपाध्यक्ष*
सर्वज्ञानी संजयजी राऊत(Sanjay Raut) यांना श्री राहुलजी गांधी(Rahul gandhi) यांनी कौतुकाची थाप काय दिली तर आपला त्यावर स्वामीनिष्ठा त्यावर आपली परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे.
खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे संजयजी पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे

पुजा चव्हाणाच्या मारेकऱ्यांना कोण अभय देतंय आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय.
नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरिर सुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला.

महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय.

आपल्या अत्याचाराविरूद्ध सुद्धा राज्यातील एका भगिनी न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागतीये

आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आम्ही या अत्याचारविरोधात अन्यायविरोधात या विकृतीविरोधात लढतोय व लढत राहू…त्यामुळंच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात
#chitrawagh #chitrawaghonsanjayraut #sanjayraut #bjp #shivsena #uddhavthakare

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...