Success Password | दुर्गा गुडिलू | Sarakarnama |

3 years ago
2

महाराष्ट्राला जात नावाचा कलंक हा वर्षानुवर्षांपासून पोखरून टाकतोय. या कलंकला धुऊन काढण्याचे काम दुर्गा गुडिलू नावाच्या एका युवतीने केले. दुर्गा यांनी आपल्या राज्यामध्ये प्रचलित असलेली जात पंचायत ही संकल्पना मोडीत काढली. त्यासाठी तिने संघर्ष केला, बंड पुकारले, जात पंचायतच्या माध्यामतून लोकांना त्रास देणाऱ्या अनेक पंच मंडळींना पोलिसांच्या मदतीने तुरुंगात टाकण्याचे काम दुर्गांनी केले. एवढ्या कमी वयामध्ये एक ‘क्रांती’ करू पाहणारी दुर्गा केवळ जात पंचायतीची कर्दनकाळ म्हणून या महाराष्ट्रात ओळखल्या जात नाही, तर तिने वैदू समाजापासून वंचित असणाऱ्या त्या प्रत्येक समाजासाठी जोरकसपणे एक लढा उभा केलाय. शिक्षण, आरोग्य क्षेत्रामध्ये वंचितांना न्याय देण्याचे काम दुर्गाने केले आहे. या सर्व लढ्याचा आज ‘इतिहास’ झालाय. वंचितांसाठी, तरुणाईसाठी, बहुजनांसाठी काम करणारी दुर्गा अशी एक वेगळी ओळख दुर्गाची झाली. दुर्गाचा हा ‘सक्सेस’ डोळे दिपवून टाकणारा. साम, सकाळ, सरकारनामाच्या ‘सक्सेस पासवर्ड’ या खास कार्यक्रमात ‘सकाळ’चे संपादक संदीप काळे यांनी दुर्गा यांचा सक्सेस नेमका काय आहे हे जाणून घेतले आहे. संदीप काळे यांच्यासोबत पाहुया दुर्गा यांच्या यशाचा ‘सक्सेस पासवर्ड’.
#sandipkale #sandipkalesakal #durgagudilo #SUCCESSPASSWORD #successpassword
#saam #sakal #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...